Posts
Showing posts from February, 2026
रान पाखरू
- Get link
- X
- Other Apps
उन्हाळ्याचे दिवस होते सूर्य आगीच्या ज्वाला सोडत होता,, मुलांच्या शाळांना सुट्ट्या लागल्या सुट्ट्या म्हटलं की मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला, प्रकाश त्याची भावंडे आणि त्याचे गावातील इतर मित्र मैत्रिणी यांची टोळी, खूप उत्साही होऊन खेळण्यासाठी तयार झाली, दहा-बारा जण होते त्यांच्या टोळीमध्ये कधी लपंडाव ,कधी क्रिकेट ,तर कधी चिंपोळ्या कधी सुर पारंब्या कधी कधी सुरुपाट, असे अनेक खेळ ते सगळे मिळून खेळत यामध्ये त्यांना आपला दिवस कसा गेलेला हे कळतच नसे, कधी पोहायला जाणे, एकत्र मिळून जेवणाची छोटीशी पार्टी करणे, असे जणू त्यांचे बालपण हे सोनेरी अक्षरानेच लिहीत होते, कधी कधी तर ही मुले रानमेवा गोळा करण्यासाठी बाहेर पडत यामध्ये ती चिंचा बोरे जांभूळ आणि कधी आंब्याच्या कैऱ्या पिकलेल्या आंबे, गोळा करण्यासाठी रानोमाळ फिरत त्याची असणारी चव ही पंचपक्वानाला सुद्धा वरचढ होती, ही मुले जणू रानपाखरच होऊन त्या रानोमळ फिरत होती मस्त आपल्या आवडी जपत एक समाधानाचा आयुष्य जगत होती, एकत्र मिळून गप्पा मारणे, जोक करणे आणि संध्याकाळच्या वेळी एकत्र मिळून अंताक्षरीचा खेळ खेळणे, तसेच मिळून कधी संध्याकाळच्य...
निराधार कोण
- Get link
- X
- Other Apps
शाळेमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचे दिवस चालू होते , वेगवेगळे डेज साजरे केले जात होते, एक दिवशी शाळेमध्ये कार्यक्रम संपल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले यामध्ये खाऊ हा मुलांना पॅकिंग स्वरूपात देण्यात आला,शाळा सुटल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांमध्ये एक उत्साहाचे वातावरण होतं मुलांची संख्या भरपूर असल्यामुळे गोंधळ आणखीनच जास्त वाटत होता, प्रत्येक जण आपापल्या मित्र-मैत्रिणी सोबत गप्पा मारत सायकल घेऊन स्कूलच्या गेटमधून बाहेर पडत होता, मी सायकल घेऊन जेव्हा शाळेच्या मेन गेटच्या बाहेर आले तेव्हा गेटच्या डाव्या कोपऱ्यात मला एक आजोबा बसलेले दिसले, वय जमतेम 70- 75 असेल, त्यांची राहणीमान एकदम स्वच्छ होते आणि अंगावरती घातलेले कपडे पण स्वच्छ होते पण त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, आणि ते खाण्यासाठी काहीतरी मागत होते, त्यांना पाहून मला पुढे जायची अजिबात इच्छा झाली नाही, मी मला शाळेत भेटलेलं खाऊच पॅकेट त्या आजोबांना दिलं, आणि आजोबांनी ते पाकीट फोडून लगेच खाण्यास सुरुवात केली , तरी मात्र आजोबाच्या डोळ्यातून येणारे पाणी काही थांबत नव्हते हुंदके येत नव्हते पण डोळ्यातील अश्रू थ...
ती
- Get link
- X
- Other Apps
सकाळी साधारण आठ साडेआठ ची वेळ होती, बस स्थानकावर ची घटना, सकाळी कॉलेजला जात असताना बस स्टॅन्ड वरती उभी होती. मी व माझ्या मैत्रिणी बस मध्ये बसलो होतो ड्रायव्हर यायला वेळ होती, तेवढ्यात फेरीवाले आपापलं सामान विकण्यासाठी फिरत होते, कोणी फळ विकत होतं तर कोणी कोल्ड्रिंक शेंगदाणे ,फुटाणे असं सामान विकत होत, काही प्रवासी याला घेत होते काही पाहत होते, तेवढ्यात माझं लक्ष एसटी स्टँड वरती उभ्या असलेल्या एका तरुणीकडे गेल ती विवाहित होती, तिच्यासोबत एक चार साडेचार वर्षाचे मूल हो त ती स्त्री आमच्या बसच्या एकदम बाहेर थांबली असल्यामुळे मला तिच्या हातात असणार सामान स्पष्टपणे दिसत होता, ते मुल खाऊ घेण्यासाठी त्या विक्रेत्यांकडे पहात होता, तर त्याची आई त्या मुलाचं तोंड सारखं स्वतःकडे फिरवत असे आणि त्याला काहीतरी सांगून नादी लावण्याचा प्रयत्न करत होती त्यावेळेस त्या स्त्रीच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच भाव होता ती आपल्या मुलाला त्या, स्वतःकडे पैसे नसल्यामुळे ते जणू आपल्या मुलाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होती , तिची राहणीमान एकदम साधीच होते तेव्हा आम्ही त्या त्या विक्रेत्याकडून तिला खारे...