रान पाखरू

 उन्हाळ्याचे दिवस होते सूर्य आगीच्या ज्वाला सोडत होता,, मुलांच्या शाळांना सुट्ट्या लागल्या सुट्ट्या म्हटलं की मुलांचा आनंद गगनात मावेनासा  झाला, प्रकाश त्याची भावंडे आणि त्याचे गावातील इतर मित्र मैत्रिणी यांची टोळी, खूप उत्साही होऊन खेळण्यासाठी तयार झाली, दहा-बारा जण होते त्यांच्या टोळीमध्ये कधी लपंडाव ,कधी क्रिकेट ,तर कधी  चिंपोळ्या कधी सुर पारंब्या कधी कधी सुरुपाट, असे अनेक खेळ ते सगळे मिळून खेळत यामध्ये त्यांना आपला दिवस कसा गेलेला हे कळतच नसे, कधी पोहायला जाणे, एकत्र मिळून जेवणाची छोटीशी पार्टी करणे, असे जणू त्यांचे बालपण हे सोनेरी अक्षरानेच लिहीत होते, कधी कधी तर ही मुले रानमेवा गोळा करण्यासाठी बाहेर पडत यामध्ये ती चिंचा बोरे जांभूळ आणि कधी आंब्याच्या कैऱ्या पिकलेल्या आंबे, गोळा करण्यासाठी रानोमाळ फिरत त्याची असणारी चव ही पंचपक्वानाला सुद्धा वरचढ होती, ही मुले जणू रानपाखरच होऊन त्या रानोमळ फिरत होती मस्त आपल्या आवडी जपत एक समाधानाचा आयुष्य जगत होती, एकत्र मिळून गप्पा मारणे, जोक करणे आणि संध्याकाळच्या वेळी एकत्र मिळून अंताक्षरीचा खेळ खेळणे, तसेच मिळून कधी संध्याकाळच्या वेळी एकत्र जेवायला येणे दुपारच्या वेळी सुद्धा ती कधीकधी एकत्र जेवायला येत, दिवस असेच पुढे जात होते, प्रकाश ला घ्यायला त्याचे मामा मामी आले त्यांनी त्याला आपल्या बरोबर शहरात नेले, शहरात गेल्यानंतर त्याचा जीव खूप कासावीस होईल गावाकडे येण्यासाठी आपल्या मित्रांना भेटण्यासाठी शहरातील वातावरण त्याला अजिबात आवडले नव्हते एके दिवशी त्यांनी ठरवलं आता आपण आपल्या गावी परत जायचं पण तो शहरात आला होता शहरात असलेली वाहनांची , माणसांची  वर्दळ यातून आता आपण कसं बाहेर पडायचं याचा विचार करू तो लागला गावाकड त्याचे इतर मुलांबरोबर होणारे फिरणे घरातील व्यक्तींना अजिबात आवडत नव्हते म्हणून त्यांनी त्याला शहरात पाठवले होते शहरातील मुलांसोबत राहील सुशिक्षित होईल अशी अपेक्षा घरच्यांना होती. परंतु प्रकाश ची आवड मात्र वेगळी होते आणि त्यात वाईट काहीच नव्हते, म्हणून त्याने तेथून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला त्याने हळूहळू विचार करण्यास सुरुवात केली त्याने साठवलेले पैसे त्यांनी बाहेर काढले हळूहळू विचारपूस करत आपल्या गावी परतला आणि आपल्या आई-वडिलांना बहिण भाऊंना पाहून धायमुकलून रडू लागला आई बाबा मला माफ करा तुम्ही मला शहरात सुशिक्षित होईल शिकेल म्हणून पाठवलं होतं परंतु मला शहरात अजिबात करमलं नाही कृपया मला तुम्ही थोडं समजून घ्या. माझे वय बालपणाचे आहे हसण्या बागडण्याच्या आहे मला शहरातील त्या पिंजऱ्यात बांधू नका मला असंच रानपाखरासारखं आपल्या गावाकडे मुक्तपणे विहार करू द्या काल परत्वे मी मोठा झाल्यानंतर माझे हे दिवस पुन्हा येणार नाही, माझ्या मनाची तळमळ तुम्ही कृपया समजून घ्या मला आपल्या माणसात राहू द्या, या गावात माझे मित्र तर आहेत पण निसर्ग हा सगळ्यात माझा जवळचा मित्र आहे मी त्याच्याबरोबर मोठा होत आलो आहे कृपया मला त्याच्या सानिध्यात राहू द्या, प्रकाशचे ते केवि‌लवाने  बोल आई-वडिलांच्या हृदयाला  शिवून गेले त्यांना पण प्रकाश ची खुप आठवण येत होती म्हणून त्यांनी पण निश्चय केला की आता आपला मुलगा हा आपल्यासोबतच गावी राहीऊ गावी राहणारी मुलं पण सुशिक्षित  होतातच ,की त्याच्या आई-वडिलांनी त्याला आपल्या छातीशी कवटळ आणि बाळा चूक तुझी नव्हती चूक आमची होती आम्ही आमच्या या राना पाखराला त्या शहरातील पिंजऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न केला पण तुझे खरे सुख या आपल्या रानोमाळावरच आहे तू पुन्हा एकदा रानपाखराप्रमाणे मुक्त झाला आहे पुन्हा एकदा रानपाखरू होऊन विहार करण्यासाठी.




Comments