निराधार कोण
शाळेमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचे दिवस चालू होते , वेगवेगळे डेज साजरे केले जात होते, एक दिवशी शाळेमध्ये कार्यक्रम संपल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले यामध्ये खाऊ हा मुलांना पॅकिंग स्वरूपात देण्यात आला,शाळा सुटल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांमध्ये एक उत्साहाचे वातावरण होतं मुलांची संख्या भरपूर असल्यामुळे गोंधळ आणखीनच जास्त वाटत होता, प्रत्येक जण आपापल्या मित्र-मैत्रिणी सोबत गप्पा मारत सायकल घेऊन स्कूलच्या गेटमधून बाहेर पडत होता, मी सायकल घेऊन जेव्हा शाळेच्या मेन गेटच्या बाहेर आले तेव्हा गेटच्या डाव्या कोपऱ्यात मला एक आजोबा बसलेले दिसले, वय जमतेम 70- 75 असेल, त्यांची राहणीमान एकदम स्वच्छ होते आणि अंगावरती घातलेले कपडे पण स्वच्छ होते पण त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, आणि ते खाण्यासाठी काहीतरी मागत होते, त्यांना पाहून मला पुढे जायची अजिबात इच्छा झाली नाही, मी मला शाळेत भेटलेलं खाऊच पॅकेट त्या आजोबांना दिलं, आणि आजोबांनी ते पाकीट फोडून लगेच खाण्यास सुरुवात केली , तरी मात्र आजोबाच्या डोळ्यातून येणारे पाणी काही थांबत नव्हते हुंदके येत नव्हते पण डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते, त्यांना खाताना बघून मला मनस्वी आनंद झाला, आणि मी घराच्या दिशेने निघाले पण वाटेत माझ्या मनात विचार येऊ लागले त्या आजोबांचं घर कुठे असेल त्यांनी घर का बर सोडलं असेल? त्यांची मुलं त्यांच्याकडे लक्ष देत नसतील का? का तेच घरात एकमेकांना समजून घेण्यात चुकत असतील? माझ्या मनात असे बरेच प्रश्न निर्माण होत होते पण ते निरोत्तरीत राहत होते, त्या आजोबांच्या डोळ्यातील अश्रू पाहून त्यांना खरंच काहीतरी त्रास झाला असेल, जो आज पर्यंत त्यांनी सहन केला आणि आज त्यांच्या जणू सहनशक्तीचा अंत झाला असेल असं मला वारंवार वाटत होतं.
Comments
Post a Comment
Chhan ahe