ती

 सकाळी साधारण आठ साडेआठ ची वेळ होती,

 बस स्थानकावर ची घटना, सकाळी कॉलेजला जात असताना  बस स्टॅन्ड वरती उभी होती.

मी व माझ्या मैत्रिणी बस मध्ये बसलो होतो ड्रायव्हर यायला वेळ होती, तेवढ्यात फेरीवाले आपापलं सामान विकण्यासाठी फिरत होते, कोणी फळ विकत होतं तर कोणी कोल्ड्रिंक शेंगदाणे ,फुटाणे असं सामान विकत होत, काही प्रवासी याला घेत होते काही पाहत होते, तेवढ्यात माझं लक्ष एसटी स्टँड वरती उभ्या असलेल्या एका तरुणीकडे गेल ती विवाहित होती, तिच्यासोबत एक चार साडेचार वर्षाचे मूल हो त ती स्त्री आमच्या बसच्या एकदम बाहेर थांबली असल्यामुळे मला तिच्या हातात असणार सामान स्पष्टपणे दिसत होता, ते मुल खाऊ घेण्यासाठी त्या विक्रेत्यांकडे पहात होता, तर त्याची आई त्या मुलाचं तोंड सारखं स्वतःकडे फिरवत असे आणि त्याला काहीतरी सांगून नादी लावण्याचा प्रयत्न करत होती त्यावेळेस त्या स्त्रीच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच भाव होता ती आपल्या मुलाला त्या, स्वतःकडे पैसे नसल्यामुळे ते जणू आपल्या मुलाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होती , तिची राहणीमान एकदम साधीच होते तेव्हा आम्ही त्या त्या विक्रेत्याकडून तिला खारे शेंगदाणे घेऊन दिले, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एकदम रडवेला भाव होता. तिच्या हातात एक पिशवी होती त्या पिशवी वरती आम्हाला तिच्या लग्नातला फोटो दिसत होता, ती कोणासोबतही बोलत नव्हती तिच्याकडे पाहून मनात विचार आला काय झालं असेल बरं, कदाचित तिचं व तिच्या नवऱ्याचं भांडण झालं असेल. पण तिने सोबत जाताना घरातील कोणत्याही वस्तू न घेता फक्त आपल्या सोबत आपल्या लग्नातील फोटो घेतला होता यावरून तिचं तिच्या नवऱ्यावरती असणारे प्रेम दिसून येत होतं, ती जरी माहेरी चाललेले असले तरी पुढचा प्रश्न पडला की ही माहेरी गेली तरी तिला तिथे कोण समजून घेईल का? ज्या घरातून तिला तुझ्या घरी निघ असं म्हणून हाकलून दिलं असेल? तेच तुझं घर आहे असं सांगून पुन्हा तिला तिथून हाकलून दिले जाईल का? असं असलं तर तिचं घर कोणतं हा प्रश्न मनात कायमचं घर करून गेला आणि आणि बस कधी एकदाची माझ्या कॉलेजच्या जवळ येऊन थांबली कळालच नाही,

Comments